राष्ट्रीय स्तरावर केलेले कार्य
संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा
कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगारांना परराज्यातील त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व्यक्तिगत क्षमतेने श्रमिक ट्रेनचे नियोजन केले. त्यांच्या प्रवासखर्चाची तसेच पाणी, जेवणाची व्यवस्था करून त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविले.
- कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे हजारो परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात अडकून पडले होते. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या आवाहनानंतर राज्यातील गोरगरीब मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी स्वत: पुढाकार घेत व्यक्तिगत क्षमतेने श्रमिक ट्रेनचे नियोजन केले.
- श्रमिक ट्रेनमधून जाणाऱ्या सुमारे पाच हजार मजुरांच्या प्रवासखर्चाची तसेच जेवण, पाणी, सॅनिटायझरची व्यवस्था करून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले.
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दहा हजारांहून अधिक कामगारांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची सोय करून नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.
- खाजगी गाड्या व बसच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मूळ गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
- परप्रांतीय मजूर व गरीब नागरिकांना डॉ. पतंगराव कदम आपत्ती व्यवस्थापन कक्षा द्वारे मोफत धान्याच्या किटचे वाटप केले.
