परिचय

आ. डॉ. विश्वजीत कदम

कार्यवाह, भारती विद्यापीठ
प्र कुलगुरु, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे
माजी राज्यमंत्री, म. राज्य तथा आमदार, पलूस-कडेगाव विधानसभा

आ. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचं नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभं राहतं ते अतिशय विनयशील, सभ्य, सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाची ठळक ओळख निर्माण करणारं, संकटसमयी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणारं, सर्वांशी मिळून मिसळून वागणारं, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणाईच्या ऊर्जेला विधायक वळण देणारं, जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून भविष्याचा वेध घेणारं, विकासाची दूरदृष्टी असलेलं आश्वासक व दमदार युवा नेतृत्व.

आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी विविध क्षेत्रात

केलेले कार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या गुणात्मक वाढीसाठी, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून भर दिला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

राजकीय क्षेत्रातील कार्य

आ. डॉ. विश्वजीत कदम यांना समाजकारण, राजकारण, कृषी, सहकार, शिक्षण, कला, क्रीडा आदी क्षेत्रात काम करण्याचे बाळकडू दिवंगत डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्याकडून मिळाले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून अल्पावधीतच मुसंडी मारली. त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने राज्य व देश पातळीवरील राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे.

सामाजिक क्षेत्रातील कार्य

गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, युवक, महिला, अल्पसंख्याक अशा समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी अहर्निश झटणारे कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व म्हणजे आ. डॉ. विश्वजीत कदम. जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला, संकटकाळी जनतेच्या मदतीला धावून जाणारा संकटमोचक, दूरदर्शी आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा सहृदयी लोकनेता अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ झाली आहे.

कला व क्रीडा क्षेत्रातील कार्य

आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राबरोबर कला व क्रीडा क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे, आजही करत आहेत. खेळाडूंना व कलाकारांना उत्तेजन मिळावे यासाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच फुटबॉल, कुस्ती अशा विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले असून, कडेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभिजीत कदम कुस्ती प्रशिक्षण संकुल उभारले आहे. अनेक खेळाडू व कलावंतांच्या अडचणी दूर करून त्यांना संकटकाळात भरीव मदत केली आहे.

सहकार क्षेत्रातील कार्य

आ. डॉ. विश्वजीत कदम हे सहकार क्षेत्रातही मोलाचे योगदान देत आहेत. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., वांगी, ता. पलूस, सागरेश्वर सहकारी सूतगिरणी लि., कडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे अशा विविध संस्थांचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठ, भारती सहकारी बँक, भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार अशा विविध संस्थांची वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कार्य

आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या व्यक्तिगत संबंधाबरोबरच भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे काम केले आहे. सन २०२० मध्ये कोरोना काळात ते ‘कोरोना योद्धा’ च्या रुपात लोकांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी मतदारसंघासह पुणे व सांगली येथे अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू करून कोरोना चाचणी, औषधोपचाराची व्यवस्था करून हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे.

सोशल मीडियावर आमच्याशी संपर्कात रहा!

आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवलेले धडाडीचे लोकनेते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास...

आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवलेले धडाडीचे लोकनेते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास...

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून माननीय डॉ. विश्वजीत कदम यांचा हॅट्रिक विजय!

नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय हॅट्रिक विजय मिळवला. त्यांनी ३०,०६४ मतांच्या फरकाने विजय मिळवला, भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आणि मतदारसंघाचा विश्वास संपादन केला.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मतांनी विजयी होण्याचा विक्रम

डॉ. विश्वजीत कदम यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ एवढ्या प्रचंड मतांनी विजयी होण्याचा विक्रम स्थापित केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार म्हणून बिनविरोध निवड

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड

२०१४ साली त्यांची पुन्हा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमतांनी निवड करण्यात आली. ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने, मोर्चे, उपोषण, सभा यांच्या माध्यमातून सामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचे काम सातत्याने केले. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध कृती कार्यक्रम राबविले.

बुलढाणा ते सांगली अशी ५३२ कि. मी. ची पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडली

२०१३ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किलोमीटरची पदयात्रा काढली. राज्यातील नऊ दुष्काळी जिल्ह्यांतून गेलेली ही पदयात्रा लक्षवेधी ठरली. या पद्यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणजे ‘जनतेच्या प्रश्नांसाठी ताकदीने लढणारा युवा नेता’, अशी ओळख सबंध राज्यभर निर्माण झाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची भूमिका हिरीरीने मांडून प्रचाराची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली

२०१२ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभागी होऊन कॉंग्रेसची भूमिका मांडली. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रचंड मतांनी निवड

२०११ साली ते महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रचंड मतांनी निवडून आले. या काळात त्यांनी राज्यभर दौरे करून पक्ष बांधणीसाठी मोलाचे कार्य केले. तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले. युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली.

प्रदेश युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

२००८ मध्ये प्रदेश युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. राज्यात ठिकठिकाणी दौरे करून कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून युवकांना मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

सन २००७ मध्ये कॉंग्रेस नेतृत्वाने डॉ. विश्वजीत कदम यांच्या धडाकेबाज कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड केली. त्यांनी या संधीचे सोने करत राज्यभर युवक कॉंग्रेसचे संघटन मजबूत केले. त्यांनी पक्ष बांधणीसाठी मोलाचे योगदान दिले

वयाच्या १८ व्या वर्षी राजकारणात प्रवेश

१९९९ मध्ये आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी वयाच्या १८ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाचा कृतिशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी पलूस, कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरुणांचे संघटन उभारून कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासोबत कनेक्ट व्हा!

Facebook

Instagram

बातम्या आणि कार्यक्रम

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top