माझं गाव
पलूस-कडेगाव
पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ-२८५ हा महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश-२००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा सांगली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. पलूस-कडेगाव मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. त्यांचे जीवन ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले आहे. या भागात शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास हे प्रमुख मुद्दे आहेत. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कष्टकरी, शेतकरी, वंचित, शोषित व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध विकास योजना राबविल्या.
वेध भविष्याचा, ध्यास प्रगतीचा, निर्धार जनसेवेचा..!
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून स्व. डॉ. पतंगराव काम साहेबांचे अपुरे राहिलेले विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी ते अविरत प्रयत्न करत आहेत.
Vision
गुणात्मक व संख्यात्मक बदल आणि परिपक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे विकास होय, खेडेगाव सुधारले तर राज्य व देश सुधारेल, अशी त्यांची ठाम धारणा असून, मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी ते कायम झटत असतात. ग्रामीण भागात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, कृषी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रात सुधारणा करण्यावर त्यांचा भर आहे.
Mission
पलूस-कडेगाव मतदारसंघात पायाभूत सुविधांचा विकास व सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार व समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, मतदारसंघाला सर्व क्षेत्रात समृद्ध आणि प्रगत बनवणे, शेतकरी, तरुण व महिलांना स्वावलंबी बनवणे हे आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे मिशन आहे.
कटिबद्ध पलूस-कडेगावच्या विकासासाठी
जनसामान्यांच्या शाश्वत व सर्वांगीण प्रगतीसाठी
सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपली नाममुद्रा उमटवलेले धडाडीचे लोकनेते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास...
- प्रारंभीच्या काळात जनजागृती मोहिमा. गाव, तालुका, जिल्हा स्तरावर.
- मतदार संघाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे नियोजन व अंमलबजावणी यामध्ये सक्रिय सहभाग.
- जीवनावश्यक वस्तू, धान्य, औषधसाठा यांची मुबलक उपलब्धता करून देण्याची खातरजमा. अनेक वंचित घटकांना, गोरगरीब, मजूर आदी घटकांना त्याचा मोफत पुरवठा.
- मतदारसंघात घरोघरी जाऊन आरोग्यदूत यांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग बचावासाठी जनजागृती.
- कोरोना संसर्गाचा जगभर आणि देशभर फैलाव होत असताना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना.
- तब्बल ६० हजार कुटुंबांना साबण, मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप.
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना या माझ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझरचे निर्मिती आणि वाटप.
- मतदार संघ आणि पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण भागामध्ये कोविड सेंटर, विलगीकरण केंद्र आदींची निर्मिती.
- या सर्व केंद्रांमधील नागरिकांना आरोग्य सुविधांपासून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भोजन यांचे मोफत वाटप.
