सुसंस्कृत नेता आ. डॉ. विश्वजीत कदम

विनम्र, सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू व जनहितासाठी धडाडीने काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी अशी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची ख्याती आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणारे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे ते सुपुत्र आहेत. लोक त्यांना ‘बाळासाहेब’ या नावानेही संबोधतात. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या आदर्श विचारांचा व कार्याचा वारसा ते नेटाने पुढे चालवत आहेत. सांगली जिल्ह्याच्या या भूमिपुत्राने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, कृषी, सहकार, कला, क्रीडा क्षेत्रात व ग्रामविकासासाठी उल्लेखनीय काम करून महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी आपल्या आमदार व मंत्रिपदाच्या काळात विविध विकास योजना राबवून पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. जनसामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. डॉ. विश्वजीत कदम हे अविरत काम करत आहेत. विकासाची दूरदृष्टी व दांडगा जनसंपर्क असलेले एक कार्यक्षम, गतिमान, कृतिशील व दमदार नेतृत्व आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या रूपाने पलूस-कडेगाव मतदारसंघाला लाभले आहे. आज राजकारणात सुसंस्कृत नेते अगदी बोटावर मोजण्याइतके दिसून येतात. त्यात आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयमाला पतंगराव कदम, वडील स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व कुटुंबातील वडीलधारी मंडळींनी केलेल्या संस्काराच्या शिदोरीवर त्यांची वाटचाल सुरू आहे.
साधेपणा, लढाऊ वृत्ती, द्रष्टेपणा, संयम, तितकाच कणखरपणा अंगी असलेले स्व. डॉ.पतंगराव कदमसाहेब हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे एक अजातशत्रू नेते होते. गरजू, अडलेल्या, नडलेल्या माणसाची मदत करण्यातच खरा आनंद असतो, ही स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणणारे आ. डॉ. विश्वजीत कदम हे जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून आजही लोकांना स्व. डॉ.पतंगराव कदम साहेबांची आठवण होते. ऊर्जादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. पलूस, कडेगाव मतदारसंघात व सांगली जिल्ह्यात ज्या-ज्यावेळी अतिवृष्टी किंवा महापुराचे संकट आले त्या-त्यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम हे पूरग्रस्तांना मदत करण्यात अग्रभागी होते हे आजवर सर्वांनी पाहिले आहे. आजही ते देवदूतासारखे संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जातात. कॉंग्रेस पक्षावर त्यांची अविचल निष्ठा असून, गोरगरीब, पीडित, वंचित, शोषित समाजघटकांच्या उन्नतीसाठी झटण्याच्या कॉंग्रेस संस्कृतीचा पाईक होत ते जनतेची सेवा करत आले आहेत. आजही करत आहेत. स्वत:चे दु:ख विसरून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व वंचितांच्या आयुष्यात आनंदाची बाग फुलविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. स्व. डॉ.पतंगराव कदम साहेबांनी संपूर्ण आयुष्यात कुणाबद्दल अपशब्द काढले नाहीत किंवा कुणाला दुखावले नाही. त्यांच्यावर आजपर्यंत एकही आरोप झाला नाही किंवा विरोधकांनी त्यांच्यावर जहरी टीका कधी केली नाही. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्यांचा संकल्प कधी डळमळला नाही किंवा संकटाला घाबरून ते मागे हटले नाहीत. आ. डॉ. विश्वजीत कदम हेही असेच जनसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलेले संयमी, कणखर,निडर व निगर्वी व्यक्तिमत्त्व आहे.
तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे धडपड करणारा, सर्वांशी मिळून मिसळून आपुलकीने वागणारा, सामान्य लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा संवेदनशील मनाचा हा सह्र्दयी नेता गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वैचारिक मतभेद निर्माण झाले तरी त्यांनी कधीही विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट, असे म्हणत त्यांनी दुसऱ्यांच्या मताचाही तितकाच आदर केला. नैतिक मूल्यांची जपणूक करत, तत्त्वांशी तडजोड न करता जनतेच्या समस्या व विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते समर्पित वृत्तीने काम करतात. सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यावर त्यांचा भर राहिला असून, गरजूंना मदतीचा हात देण्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
सुसंस्कृती म्हणजे केवळ शिष्टाचार नाही, तर ती एक जीवनशैली आहे, सुसंस्कृत नेत्यामुळे समाजाच्या प्रगतीला गती मिळते. आ. डॉ. विश्वजीत कदम यांची जीवन व कार्यशैली आदर्श अशीच आहे. कर्तव्यभावना व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते जीवाचे रान करतात. हा त्यांच्यावर लहानपणी झालेल्या संस्काराचाच एक भाग आहे. युवा कार्यकर्त्यांसोबत ते जसे प्रेमाने वागतात तसे वडीलधाऱ्या मंडळींचा आदर-सन्मान करतात. राजकीय नेतेमंडळींना सामाजिक भान ठेवून वर्तन ठेवावे लागते. याची जाण असलेल्या आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना नेहमीच काळजी घेतली आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच सुस्पष्टता, पारदर्शकता व विनम्रता असते. आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे कार्य तरुण पिढीसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top