विटा नवीन बसस्थानकाच्या कामाची पाहणी

सकाळी वृत्तपत्रामध्ये विटा येथील जुन्या बस स्थानकात प्रवाशांना निवारा शेड नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबतची बातमी वाचनात आली. विटा बसस्थानक आणि कदम कुटुंब यांचे नाते अतूट आहे, अनेक आठवणी या स्थानकाशी जोडलेल्या आहेत.

आज आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना विटा येथे सुरू असलेल्या नवीन बसस्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.

या पाहणीवेळी खासदार विशालदादा पाटील आणि आमदार सुहासभैय्या बाबर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top