कडेगाव तालुक्यातील रामापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेविषयी निर्माण झालेल्या वादावर प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या आराध्य दैवत असून त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण पुढे जावे, हे अत्यंत गरजेचे आहे. रामापूर येथील युवकांच्या उपक्रमांतून त्यांच्या शिवरायांबद्दलची श्रद्धा स्पष्ट दिसून येते.
पुतळा बसवताना अनेक शासकीय परवानग्या आणि आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडणे अत्यंत महत्वाचे आहे. युवकांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुढील पावले उचलावीत. प्रशासनाने युवकांच्या बाबतीत समजूतदारपणा दाखवून कोणतीही कठोर कारवाई न करता लवकरात लवकर परवानगी मिळवून पुतळा स्थापनेचे काम पूर्ण होईल यासाठी मार्गदर्शन आणि मदत करावी, असा निर्णय चर्चेअंती झाला. या संवेदनशील विषयाकडे युवक आणि प्रशासन दोघांनीही योग्य काळजी घेणे आवश्यक असून यासाठी माझे सदैव सहकार्य असेल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.


