आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी पलूस येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात येत आहे. या कामाचा सखोल आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारंगकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पलूस तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सद्याचे ग्रामीण रुग्णालय अपुरे पडते आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे रुग्णांना अधिक सुविधा आणि चांगला लाभ मिळणार आहे.
बैठकीत नव्या इमारतीचा नियोजनबद्ध आराखडा, आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा आणि इतर संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली.



