ज्याचे उद्योगमंत्री मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता, पलूस तालुक्यातील शाळगांव, रायगांव व बोंबाळेवाडी (ता. कडेगांव) येथील ग्रामस्थांनी शाळगांव-बोंबाळेवाडी एम.आय.डी.सी.मधील सुरू असलेल्या केमिकल व फर्टिलायझर कंपन्यांविरोधात निवेदन दिले.
ग्रामस्थांच्या निवेदनातील मुख्य मुद्दे:
- वायू व पाणीप्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम:
या कंपन्यांमधून होणारे वायू व केमिकलयुक्त पाण्याचे प्रदूषण पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना व शेतीस हानी पोहोचवत आहे. - भूगर्भातील जलस्त्रोत धोक्यात:
काही कंपन्यांनी ५००-७०० फूट खोल बोअर मारून त्यात रासायनिक पाणी सोडल्यामुळे भूगर्भजल दूषित झाले आहे. - शेती व आरोग्यावर परिणाम:
एमआयडीसीतील रासायनिक टँकर थेट शेतात ओतले जात असून त्यामुळे पिके जळत आहेत आणि श्वसनाचे व इतर गंभीर आजार वाढत आहेत. - भयानक अपघाताची पार्श्वभूमी:
दि. २१/११/२०२४ रोजी मॅनमार कंपनीतून अमोनिया वायू गळतीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला होता. आजही यावर ठोस उपाय झालेले नाहीत. - कायदेशीर परवानगी नसतानाही सुरू असलेले प्रकल्प:
लोकवस्तीतून फक्त ५०० मीटर अंतरावर असलेल्या रासायनिक कंपन्यांना बेकायदेशीर परवानग्या दिल्याचा आरोप आहे.
ग्रामस्थांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
- मॅनमार कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.
- एमआयडीसीतील सर्व केमिकल व फर्टिलायझर कंपन्यांची सखोल चौकशी करून त्यांना बंद करण्यात यावे.
- ग्रीन झेन कंपनीच्या अतिविषारी प्रदूषणावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.
- यापुढे एमआयडीसीमध्ये कोणत्याही रासायनिक प्रकल्पास परवानगी देऊ नये.
- या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी.
ग्रामस्थांनी याआधीही दि. २६/०१/२०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते, त्यानंतर काही हालचाली झाल्या पण कायमस्वरूपी उपाय अद्याप नाही. त्यामुळे या वेळेस तात्काळ व ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



