नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात सहभाग

मुंबईतील आझाद मैदानावर नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्दीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला गेला. या महामार्गामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागणार असून, त्यांच्या जमिनींचा मोठा भाग गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

या महामार्गाच्या अंमलबजावणीत स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विश्वासात घेण्याचे महत्त्व असूनही, त्याचा योग्य समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध रोष वाढत आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालेल्यांनी ठामपणे साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.

या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे, विधानसभेचे गटनेते आ. विजय वड्डेटीवार, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री मा. सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आ. जयंत आसगावकर, आ. अरुण लाड यांच्यासह राज्यभरातील विविध संघटना आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top