धोम, कण्हेर, उरमोडी व तारळी कालवा सल्लागार समिती बैठक

धोम, कण्हेर, उरमोडी आणि तारळी प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची उन्हाळी हंगामातील पाणी नियोजनासंदर्भातील बैठक जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत ताकारी, टेंभू व म्हैसाळ प्रकल्पांतील पाणी व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा झाली.
उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन करून ठोस निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.

विशेषतः आरफळ योजनेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेतून पाणी सोडले गेलेले नाही. परिणामी:

  • शेती धोक्यात आली आहे,
  • पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

ग्रामस्थांच्या वतीने बैठकित लवकरात लवकर आरफळ योजनेतून पाणी सोडावे, अशी मागणी ठामपणे मांडण्यात आली.
या मागणीला प्रतिसाद देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top