धनगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी धनगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करत, “समृद्ध धनगाव” हेच आपले ध्येय असल्याचे सांगण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने हे स्वप्न साकार करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन व भूमिपूजन झालेली कामे पुढीलप्रमाणे:
- श्री कृष्ण महानुभव मठ जीर्णोद्धार – ₹१० लाख
- तलाठी कार्यालयाचे लोकार्पण – ₹१३ लाख
- धनगाव ते खंडोबाचीवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण (भूमिपूजन) – ₹६ कोटी १० लाख


