राज्याचे उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत पलूस-कडेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, पलूस येथील विविध उद्योजकांच्या अडचणींबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये पुढील चार महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या:
- पलूस शहरात एखादी मोठी औद्योगिक कंपनी स्थापन व्हावी, जेणेकरून स्थानिक लघुउद्योगांना काम मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
- पलूस एम.आय.डी.सी.मध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे, जवळील सांडगेवाडी येथील कृष्णा वाईन पार्कची जागा औद्योगिक वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
- उद्योजकांचे मंजूर असलेले अनुदान (सबसीडी) लवकरात लवकर वितरित व्हावे, यासाठी त्वरित कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
- पलूस औद्योगिक वसाहतीतील रस्ते, स्ट्रीट लाइट, व ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.


