आमणापूर येथे पाणीपुरवठा पाईपलाईनच्या संरक्षक उपाययोजनांसंदर्भात पाहणी व चर्चा

आमणापूर येथे डॉ. पतंगराव कदम यशवंत सहकारी पाणीपुरवठा संस्था, पलूस यांच्या विद्यमान कामाचा आढावा घेण्यात आला. या ठिकाणी पुसेसावळी-वाळवा राज्य महामार्गाच्या खालून संस्थेच्या 750 मिमीच्या दोन मुख्य पाईपलाईन्स जात आहेत.

भविष्यात या ठिकाणी गळती झाल्यास, ती शोधणे, दुरुस्त करणे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हे अतिशय कठीण आणि अशक्यप्राय होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधून संरचनात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पाईपलाईनची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पोळ साहेब, सुहास पदाले, विष्णू नाना सिसाळ, अरविंद वाघमारे, अधिकराव जाधव, उदय मोरे तसेच पाणीपुरवठा संस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top